पाथर्डी3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तहसीलदार शाम वाडकर यांना देतांना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते
पाथर्डी तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खरीपाची पिके जळून गेली आहेत. रब्बी हंगाम धोक्यात आहे. राज्य सरकारने पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सवलती मिळाव्यात, या मागणीचे निवेदन पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता संपूर्ण पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, अशा घोषणा देत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी पाथर्डी तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अजिबातच पाऊस झाला नाही. तालुक्यातील सर्वच मंडळातील खरीप पिके पावसाअभावी जळून गेली आहेत. रब्बी पिकांची तर शक्यता नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व तलाव, नालाबंडिंग, बंधारे, सर्वच पाणवठे, नद्या कोरड्याठाक आहेत. विहिरीची पाणी पातळी खोलवर गेली असून तळ गाठला आहे. जून महिन्यापासून पिण्याचे पाण्याचे सुरु असलेले टॅकर सप्टेंबर अखेर पर्यंत सुरु होते. ऑक्टोबर मध्ये पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सुरु झाली आहे. त्यामुळे पुढील सहा ते आठ महिने तालुक्यातील जनतेला यातीव्र दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.