Pimpri News :‘त्या’ डबक्यातील पाणी काढले | महातंत्र








पिंपरी : महातंत्र वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी महिंद्रा सेन्ट्रो हाउसिंग सोसायटीसमोर खोदलेल्या खासगी जागेत खड्डा तयार झाल्याने पाणी साचून डबके तयार झाले होते. त्यामुळे डेंगीचा प्रसार करणार्‍या डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्या डबक्यातील पाणी उपसून काढण्यात आले आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘डबक्यामुळे डासोत्पत्ती; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात’ असे छायाचित्रासह वृत्त ‘महातंत्र’ने 17 ऑक्टोबरला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्या डबक्यात पाईप सोडून विद्युत मोटार लावून पाणी उपसून काढण्यात आले.

रात्रीच्या वेळेत सलग 10 ते 12 दिवस हे पाणी रस्त्यावर सोडून देण्यात आले. हे पाणी वाहून मोरवाडी चौकापर्यंत पोहोचत होते. पाणी काढल्याने डबके आता रिकामे झाले आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या डबक्यात पाणी साचू नये, म्हणून महापालिकेने दक्षता घ्यावी, अशी तक्रार रहिवाशी संतोष इंगळे यांनी केली आहे.

हेही वाचा 

शेतकऱ्यांवरील संकट वाढले ! वातावरणातील बदलामुळे पिकांवर कीड

Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलिस चौकीत राडा

Pimpri News : पात्र उमेदवार नोव्हेंबरअखेरपर्यंत रुजू









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *