दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधीच सौरभ गांगुलीच्या भावाला पोलिसांची नोटीस; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या (World Cup) सामन्यांची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्यांच तिकीट मिळावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अनेकांना ही तिकीटे मिळत नाहीत. अशातच ईडन गार्डन्सवर 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) सामन्यासाठी तिकीटांचा काळाबाजर झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (sourav ganguly) भावाच्या या सामन्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) सौरव गांगुलीच्या भावाला समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष स्नेहशिष गंगोपाध्याय यांना वर्ल्डकपच्या तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या प्रकरणात समन्स पाठवले आहे. स्नेहाशिष हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भाऊ आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना 24 तासांत हजर राहण्यास सांगितले आहे. कोलकातामध्ये तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपांखाली सात गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 जणांना अटक करण्यात आली आहे. स्नेहाशिष यांना 2 नोव्हेंबरला नोटीस पाठवली होती.

2 नोव्हेंबर रोजी कोलकाता पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बुक माय शोला देखील समन्स पाठवले होते. बुक माय शो वर्ल्डकप 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा अधिकृत भागीदार आहे. ईडन गार्डन्सवर 5 नोव्हेंबरला होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यासाठी 1 नोव्हेंबरपासून छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत 94 तिकिटे जप्त केली आहेत. 900 रुपयांचे तिकीट 8 हजार रुपयांना विकले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Related News

माध्यमाच्या वृत्तानुसार, एका क्रिकेट चाहत्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची 900 रुपयांची तिकिटे 8 हजार रुपयांना विकली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. या आरोपावरून पोलिसांनी सुभ्रदीप भट्टाचार्य, सुमन सरदार आणि संदिपन लाहा नावाच्या तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 17 तिकिटे जप्त केली आहेत. या घटनेनंतर  क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बुक माय शोच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध नेताजी नगर पोलिस ठाण्यात आयपीसी आणि पश्चिम बंगाल ब्लॅक मार्केटिंग कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी 21 वर्षीय हर्ष गुप्ता आणि हर्षित अग्रवाल यांना याप्रकरणी अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी आठ तिकिटे आणि दोन मोबाईल जप्त केले.

त्यानंतर आणखी एका पोलीस ठाण्यात दुसऱ्या क्रिकेट चाहत्याने तक्रार केली होती. 5 नोव्हेंबरच्या सामन्यासाठी viagogo.com नावाच्या वेबसाइटवरून 25,161 रुपयांना तीन तिकिटे बुक करण्यात आली होती. पण तिकीटे दिली गेली नाहीत, असा त्याचा आरोप होता. बुकिंग दरम्यान, आरोपी अग्रवालने तक्रारदाराला बुकिंग प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी फोन केला होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी हर्ष गुप्ता, अग्रवाल आणि वेबसाइटवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर आरोपीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी सलमान अली, इस्लामुल होदा उर्फ ​​टिंकू आणि हेमल शाह या आरोपींना अटक केली.

दुसरीकडे, सौरभ गांगुली यांनी वर्ल्डकप 2023 च्या तिकिटांच्या काळ्या बाजाराबाबत भाष्य केलं. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे. सौरभ गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, ईडन गार्डन स्टेडियमची क्षमता 67000 प्रेक्षकांची आहे, तर तिकिटांची मागणी 100000 पेक्षा जास्त होती.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *