प्रफुल्ल पटेल 83 वर्षीय बापाला त्रास देत आहेत: अनिल देशमुख यांची टीका; लाठीचार्जवरून DCM फडणवीस यांच्यावरही निशाणा

नागपूर31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांना शरद पवारांनी खूप काही दिले. पण आता तेच आपल्या 83 वर्षीय बापाला त्रास देत आहेत, अशी तिखट टीका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे बोलताना केली.

Related News

प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते होते. पवार साहेबांनी त्यांना खूप काही दिले. आता ते भाजपा आणि नरेन्द्र मोदी यांचे गुणगान गात आहेत. ज्या शरद पवारांनी पटेलांना मोठे केले, पक्षात अनेक पदे आणि अधिकार दिले. अशा 83 वर्षाच्या बापाला त्रास देत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

28 पक्षांचे लोकांनी 2 दिवस मुंबईत चर्चा करुन अनेक निर्णय घेतले. त्या बैठकीत अनेक समित्यांची स्थापना झाली. हे पचनी पडत नाही म्हणून प्रफुल्ल पटेल इंडिया आघाडीवर टीका करीत आहे. पटेलांनी स्वतःची भूमिका बदलली. म्हणूण हे 28 पक्ष एकत्र आल्याचा त्यांनी धसका घेतला आहे. यामुळेच ते अशा प्रतिक्रिया देत असतात, असे अनिल देशमुख म्हणाले.

गृह मंत्रालयावर टीकेची झोड

जालन्यात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार दुर्दैवी आहे. गृह मंत्रालयाने आदेश दिला म्हणून हा लाठीचार्ज झाला, असा आरोप देशमुख यांनी केला. मराठा समाज एकत्र येत आहे हे पाहून पोलिस अधीक्षकांना बळीचा बकरा बनवत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. निवृत्त न्यायाधीशांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी. त्यानंतर माझ्या बोलण्यात किती तथ्य आहे हे समोर येईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले.

गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय लाठीमार शक्य नाही

मी स्वतः गृहमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे काही माहिती आम्हालाही मिळत असते. गृह मंत्रालयाकडून आदेश गेल्याशिवाय अशा कारवाया होत नाहीत, असेही अनिल देशमुख यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना म्हणाले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *