छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वीच दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार मणिपूरमध्ये उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
अदाणी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यासाठी मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘टीव्ही-9 मराठी’ या वृत्तवाहिणीशी संवाद साधत होते.
मणिपूरमधील खनिजांवर आदिवासींचा ताबा
मणिपूर हिंसाचारावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचार गौतम अदाणींसाठी घडवला जातोय, असा माझा आरोप आहे. मणिपूरमधील खनिजांवर आदिवासींचा ताबा आहे. मागील सहा महिन्यात मैतेई समुदायाने आरक्षणाची मागणी केली, अशी एकही बातमी समोर आली नव्हती. कुठल्याच वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली नाही. मग केंद्र सरकारने अचानकपणे मैतेई समुदायाला आदिवासी म्हणून आरक्षण देण्याचं का घोषित केलं?
…त्यामुळे हिसाचार घडवला जातोय
संविधानातील सहाव्या परिशिष्टानुसार, आदिवासी समुदाय वास्तव्यास असलेल्या प्रदेशात ‘आदिवासी काऊन्सिल’ असतात. त्या परिसरात काहीही करायचे असेल तर आदिवासी काऊन्सिलची परवानगी आवश्यक असते. असे असताना मोदी सरकारने मणिपूरमधील खाणी अदाणींना किंवा इतर उद्योग समूहाला दिल्या आहे. पण आदिवासी काऊन्सिल हे मान्य करत नाही. त्यामुळे त्यांनी हिंसाचार घडवला, अशी परिस्थिती आहे. यावर मोदींनी बोलायला पाहिजे, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.
काही महिन्यांपासून मणिपूर पेटले
गेल्या तीन महिन्यांपासून भारताच्या ईशान्यकडील राज्य मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येऊ लागल्या आहेत. यावरून संसदेत देखील विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
हे ही वाचा
संसद अधिवेशन:राहुल गांधी म्हणाले- पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेले नाहीत, तेथे हिंदुस्थानची हत्या झाली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेला राहुल गांधींच्या भाषणाने सुरुवात झाली आहे. भाजपच्या मित्रांनी आज घाबरू नये. मी आज अदानीवर बोलणार नाही, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिमटा काढला. तसेच आज मैं दिमाग से नहीं, दिल से बोलना चाहता हूँ, म्हणत सत्ताधाऱ्यांना टोमणे हाणले. – येथे वाचा संपूर्ण बातमी