सत्यनारायणाची पूजा सुरू आहे का?: ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरून विजय वडेट्टीवार यांचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल

मुंबई43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी ही काय सत्यनारायणाची पूजा सुरू आहे काय? असा कडा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना केला आहे.

Related News

इंडिया आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी देशभरातील 28 पक्षांचे बडे नेते देशाच्या आर्थिक राजधानीत जमले होते. पण विरोधकांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीपासून दूर ठेवले होते. याविषयी आंबेडकरांना छेडले असता त्यांनी आपल्याला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले. आमची इंडिया आघाडीत जाण्याची इच्छा आहे. पण त्यांना घ्यायचे नसेल, तर आम्ही कसे जाणार? असे ते म्हणाले होते.

जोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तोडण्याचा प्रयत्न ठरेल

आंबेडकर यांच्या या विधानावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? असा सवाल केला. आंबेडकरांचा जातीयवादी शक्तींना मदत करण्याचा इरादा असेल तर आम्ही कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तोडण्याचा प्रयत्न ठरेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकून त्यांना इंडिया आघाडीत यायचे किंवा नाही हे स्पष्ट करावे. त्यानंतर त्यांना पुढच्या बैठकीसाठी निमंत्रण द्यायचे किंवा नाही याचा निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.

जुन्या बाटलीला नवे लेबल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी निजाम काळातील नोंदीच्या आधारावर मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी नवे काहीच लागू केले नाही. त्यांनी केवळ जुन्या बाटलीला नवे लेबल लावले, असे ते म्हणाले.

त्यावेळी तुम्ही झोपला होता का?

विरोधक आंदोलनाचे राजकारण करत नाहीत. त्यावेळी 28 पैकी 18 जण आमच्याबरोबर होते. त्यावेळी तुम्ही झोपला होता का? तेव्हा तुम्हाला कोरोना झाला होता का? आरक्षण द्यायची तुमची नियत असेल तर हा प्रश्न एका झटक्यात सुटेल, असेही विजय वडेट्टीवार यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *