File Photo
पुणे : महातंत्र वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला जिल्हा प्रशासनाकडून जोमाने सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएम मशिनसह व्हीव्हीपॅट चाचणीसाठी येत्या दि. 7 व 8 सप्टेंबरला पुण्यात अभिरूप मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील वर्षात (2024) साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम नेतेमंडळींकडून सुरू आहे. त्यात आता निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ हे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.
या ठिकाणी होणार्या मतदानाच्या तयारीला जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आज सोमवारपासूनच सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी आलेले ईव्हीएम मशिन, व्हीव्ही पॅट आणि इतर साहित्याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून येत्या दि. 7 आणि 8 सप्टेंबरला अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
महापालिकेकडे कर्मचार्यांची मागणी
कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामात हे मतदान होणार आहे. त्यासाठी शासकीय कर्मचारीवर्ग लागणार असल्याने जिल्हा निवडणूक कार्यालयाने पुणे महापालिका आयुक्तांकडे 120 कर्मचार्यांची मागणी केली आहे. याशिवाय इतर कार्यालयांचे कर्मचारीही या निवडणूक प्रक्रियेत असणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीनिमित्त लोकसभा निवडणुकांचा अप्रत्यक्षरीत्या डंका वाजणार आहे.
हेही वाचा :
नीरज चोप्रा : नीरजच्या गोल्डन आर्मने दुसऱ्या फेकीतच जिंकले गोल्ड