पृथ्वी शॉची विक्रमी खेळी: इंग्लंडच्या वन डे कपमध्ये 244 धावांची खेळी करत रचला इतिहास, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

  • Marathi News
  • Sports
  • Prithvi Shaw List A Record Update Tournament Double Hundred Record Sport News

नॉर्थॅम्प्टनशायर19 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ याने बुधवारी नॉर्थहॅम्प्टन काउंटी ग्राउंडवर सॉमरसेटविरुद्ध वन-डे कप स्पर्धेत नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी द्विशतक ठोकले.

शॉने 81 चेंडूत शतक पूर्ण केले आणि नंतर 153 चेंडूत 244 धावांची खेळी केली. शॉने 28 चौकार आणि 11 षटकार खेचले.

शॉने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला. त्याने ऑली रॉबिन्सनच्या 206 (2022 मध्ये केंटसाठी) मागे टाकले.

कारकिर्दीतील दुसरे द्विशतक
मुंबईच्या या फलंदाजाने लिस्ट ए कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले आहे. त्याने 2020-21 विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुद्दुचेरीविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. शॉने मुंबईसाठी नाबाद 227 धावांची खेळी केली. त्यानंतर तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

वन डे कपमध्ये नॉर्थम्प्टनशायरची दुसरी सर्वोच्च धावसंख्या
नॉर्थहॅम्प्टनशायरने वनडे कपमध्ये त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 415 धावा केल्या. शॉने नवव्या शतकासह अनेक लिस्ट ए रेकॉर्ड तोडले. गेल्या आठवड्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायर पदार्पणात शॉ 34 धावांवर हिट-विकेट बाद झाला होता.

50 षटकांच्या सामन्यात सहावा सर्वाधिक स्कोअर
पृथ्वी शॉ 50 षटकांच्या सामन्यात म्हणजेच लिस्ट ए सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत पहिले नाव तामिळनाडूच्या नारायण जगदीशनचे आहे, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावांची खेळी केली होती.

इंग्लंडमध्ये खेळत आहेत चार भारतीय
या मोसमात इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळणारा पृथ्वी शॉ हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी चेतेश्वर पुजारा (ससेक्स), अजिंक्य रहाणे (लीसेस्टरशायर), अर्शदीप सिंग (केंट) आणि नवदीप सैनी (वोस्टरशायर) हे देखील इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटचा भाग राहिले आहेत. मात्र, अर्शदीप, सैनी आणि रहाणे यांनी नावे मागे घेतली आहेत. पुजारा वन डे कपमध्ये ससेक्स संघाकडून खेळत आहे.

शॉला 2021 पासून संधी नाही
2018 मध्ये कर्णधार म्हणून भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉने 2018 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने शतक झळकावले, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे तंत्र गोलंदाजांसमोर कमकुवत दिसत होते. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे म्हणून खेळला आणि तेव्हापासून तो भारतासाठी एकही सामना खेळू शकला नाही.

या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शॉचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या उपस्थितीत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. आता टी-20 टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, अशा परिस्थितीत आयपीएलच्या खराब हंगामानंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *