प्रोमो, VIDEO: ‘शिवसेना म्हणजे अग्निकुंड, विझला तर महाराष्ट्रातील आग संपेल’, ED दहशतवादी संघटना; संजय राऊतांचा घणाघात

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Promo Shivsena Podcast Aavaj Kunacha Video Realese  | Sanjay Raut Attack On Ed And Bjp Talk About Uddhav Thackeray Balasaheb Thackeray

मुंबई10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शिवसेना ठाकरे गट ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये विविध नेत्यांनी हजेरी लावली आहे. याआधीच्या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत झाली. आता खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात राऊत यांनी जोरदार भाष्य करत भाजप, शिंदेसेनेवर टोलेबाजी केली आहे. शिवसेना म्हणजे अग्निकुंड असून तो विझला तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असे राऊत म्हणाले.

शिवसेना म्हणजे अग्निकुंड
दीड मिनिटांच्या प्रोमो व्हिडिओत संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. राऊत म्हणतात, ज्या मराठी माणसाला भिकारी, घाटी, कोकणी म्हणलं जायचं. त्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मित्रपक्षाने फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? संपली का? शिवसेना म्हणजे अग्नीकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

भाजपला कदापी क्षमा नाही
उद्धव ठाकरेंनी पक्षांचं नेतृत्व स्वीकारल्यापासून बाळासाहेबांची संघटना दोन पाऊले पुढे नेली. भाजपाने ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली, त्याबद्दल त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणूक घेण्यास घाबरतात. लोकसभा घेतील का नाही? अशी शंका आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

याला बहुमत नव्हे व्यापार म्हणतात
शंभर भ्रष्टाचारी गोळा करून आपल्या पक्षात घ्यायचे, हे कोणतं बहुमत आहे? याला बहुमत नाही, व्यापार म्हणतात. ईडी ही दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या बापाचे घर असल्यासारखं ताबा घेतात. शिवसेना ही सत्तेसाठी नाहीतर महाराष्ट्र आणि जनतेच्या संघर्षांसाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल, असेही संजय राऊतांनी सांगितलं.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *