प्रतिपादन: साहित्य परिषद, नाट्य परिषदेने एकत्रित काम करावे : अभिनेते प्रशांत दामले; कल्याणराव जाधव सभागृह व अभ्यासिकेचे उद्घाटन

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sahitya Parishad And Natya Parishad Should Work Together Actor Prashant Damle | Inauguration Of Kalyanrao Jadhav Auditorium And Study Hall

पुणे18 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषद या दोन्ही संस्था एकाच दिशेने जाणाऱ्या असल्याने येणाऱ्या काळात मिळून काम करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. कल्याणराव जाधव सभागृह आणि अभ्यासिकेचे उदघाटन दामले यांच्या हस्ते झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित उपस्थित होते. ज्यांच्या देणगीतून हे सभागृह आणि अभ्यासिका साकारली ते दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह ऍड. प्रमोद आडकर उपस्थित होते.

दामले म्हणाले, वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन चालणे हे किती आव्हानात्मक आहे हे नाट्य परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना लक्षात येते आहे. साहित्य परिषद ११८ वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे. डॉ. राजा दीक्षित म्हणाले, पैसा कमावणारे अनेक, पण दानत असणारे फार कमी असतात. विनोद जाधव यांची दानशूरता विलक्षण आहे. साहित्य परिषद हे महाराष्ट्रातील साहित्य प्रबोधनाचे फलित आहे.

विनोद जाधव म्हणाले, साहित्य हा व्यवहारातील भाषेचा दागिना असतो. व्यवहारात मराठी राहिली तर साहित्यात ही भाषा नक्कीच राहिल. माझ्या वडिलांनी १५ वर्षे मराठी मासिक चालवले. वडिलांच्या स्मृतीनिमित्त आणि मराठी भाषा व्यवहारात राहावी या भावनेने या सभागृह आणि अभ्यासिकेला देणगी दिली आहे

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, नाट्य परिषद आणि साहित्य परिषद यांनी खरोखरीच एकत्र येऊन काम करायला हवे. साहित्य संस्थांनीही कालानुरूप बदलणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेची वास्तू दिमाखदार आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त व्हावी असे साहित्यिकांचे आणि साहित्य रसिकांचे अनके दशकांचे स्वप्न होते. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले. प्रास्ताविक सुनीताराजे पवार यांनी केले. ऍड. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.

प्रशांत दामले यांना दाद

आपल्या बायकोला वाचता येणं ही सर्वात मोठी कादंबरी वाचण्यासारखे आहे. आपल्याला जमिनीवर आणायचे काम करते ती बायको. आपण कितीही वर गेलो तरी तिच आपल्याला जागेवर आणते. त्यामुळे नाटक फक्त बाहेरच करावं लागतं असे नाही तर घरातही करावं लागतं असे त्यांनी सांगितल्यावर सगळेच हसले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *