बांगलादेशमध्‍ये पंतप्रधान पंतप्रधान शेख हसीना यांच्‍या विरोधातील मोर्चाला हिंसक वळण, पोलीस ठार, शेकडो जखमी | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशच्‍या पंतप्रधान शेख हसीना यांच्‍या राजीनाम्‍याच्‍या मागणीसाठी विरोधी पक्षाने काढलेल्‍या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी झालेल्‍या हिंसाचारात एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. ( Bangladesh opposition rally )

पंतप्रधान हसीना शेख यांच्‍या विरोधात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी मार्चाचे आयोजन केले होते. नयापल्टन येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयासमोर मोर्चा काढण्‍याची परवानगी मिळाली होती. बीएनपी समर्थकांनी रॅलीदरम्यान बांगलादेशच्या सरन्यायाधीशांच्या निवासस्थानालाही लक्ष्य केले. त्‍यामुळे परिस्थिती चिघळली. आणखीनच वाढली. मार्चेकरांनी सरन्यायाधीशांचे घर, न्यायाधीशांचे निवासस्थान, पोलीस चौकी, सार्वजनिक वाहतूक, रुग्णालयांसह विविध सरकारी मालमत्तांवर हल्ला केला, असे सूत्रांनी सांगितले.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल यांनी सांगितले की, “व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमध्ये छात्र दल (बीएनपीच्या विद्यार्थी संघटना) नेत्याचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे. बांगलादेश सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावरील हल्ला ही अभूतपूर्व घटना होती. या हिंसाचारासाठी जबाबदार ठरलेल्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यात येणार आहे.”
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील तणाव अधिक तीव्र होणार

बांगलादेशच्या आगामी निवडणुका जानेवारी 2024 च्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे. त्‍यामुळे विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी आणि सत्ताधारी पक्ष अवामी लीग यांच्यातील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे. 25-26 ऑक्टोबर रोजी दोन दिवस चाललेल्या ‘ग्लोबल गेटवे फोरम’ला उपस्थित राहून पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी ब्रुसेल्सहून परतल्या. दुपारी १२.१५ वाजता ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्‍या पोहचल्‍या. यावेळी विरोधी पक्ष बीएनपी समर्थकांनी ढाका शहरात त्‍यांच्‍याविरोधात निदर्शने केली.

हेही वाचा : 

 











Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *