Pune News: ना आयआयटी झालं ना इंजिनियरिंग; Google ने पुण्याच्या पठ्ठ्याला दिला डोळे गरगरणारा पगार!

Harshal Juikar Google Job: गुगलसारख्या मोठ्या मल्टीस्टार कंपनीमध्ये काम करावं, असं कोणाला वाटत नसेल. अनेकजण डोळे उघडे ठेऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये करियर सेट करण्याची स्वप्न अनेकजण पाहत असतात. मात्र, परिश्रम घेऊन देखील अनेकांना मुक्काम गाठता येत नाही. मात्र, अशातच पुण्यातील एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सीटीच्या (Pune News) एका तरुणाचं नशिब चमकलं आहे. पुण्यातील विद्यार्थी हर्षल जुईकर (Harshal Juikar) याने कमी वयातच गुगलकडून 50 लाख रुपयांचे प्रभावी वेतन पॅकेज मिळवलं आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हर्षल हा एक नॉन-इंजिनीअरिंग पदवीधर आहे. थ्री इडियट्समध्ये राँचोने म्हटल्याप्रमाणे त्याने आपली आवड जोपासली. पारंपरिक करिअर मार्गांना नकार देत ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये (Blockchain technology) एमएससी केलं. एकंदरीतच हर्षलचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. त्यामुळे त्याच्यामधील कौशल्य पाहता गुगलने त्याची थेट निवड केली. गुगलने 50 लाख रुपयांचं पॅकेज देत हर्षलला आपलसं करून घेतलंय.

माझ्या कष्टाचं फळ मिळालं…

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या वेगवान जगात सुसंगत राहण्यासाठी माझी कौशल्यं सतत अद्ययावत करत राहणं. स्वत:ला अपटेड ठेवणं महत्त्वाचं आहे, हे जाणवलं. फक्त पुस्तकी ज्ञान न घेता, मी वेगवेगळी माहिती घेत गेलो. पुणे येथून ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स करत असताना, मी उद्योग तज्ञांकडून मूलभूत गोष्टींवर प्रशिक्षण घेतलं. अल्गोरिदम, मोठ्या डेटासेटवर काम करणं, यासर्व गोष्टी शिकून घेतल्या. माझ्या कष्टाचे आणि समर्पणाचे इतके उल्लेखनीय फळ मिळाले यावर माझा विश्वासच बसत नव्हता, असं म्हणत हर्षलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related News

आणखी वाचा – ‘चॅम्पियन असशील घरात!’ पाकमध्ये स्नूकर चॅम्पियनला स्नूकर खेळतो म्हणून अटक

दरम्यान, गुगलसारख्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने हर्षल भावूक झाला. गुगल असो वा टेसला, अनेक कंपन्यांमध्ये भारतीय बुद्धीमत्तेचा जोर पहायला मिळतो. एवढंच काय तर नवीन विकसित होत असलेल्या चॅट जीपीटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भारतीय वैज्ञानिक काम करत आहेत. मात्र, भारतीय तरुणांच्या बुद्धीमत्तेचा देशासाठी वापर व्हावा, अशी इच्छा सर्वजण व्यक्त करत आहेत. मात्र, त्यासाठी लागणारं वातावरण भारतात तयार होऊ शकतं का? हा देखील मोठा प्रश्न आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *