Pune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video

Panvel To Nanded Train 17613: पुणे तिथं काय उणे, असं म्हणतात. पुण्यात (Pune News) कधी काय होईल सांगता येत नाही. अशातच आता पुणे रेल्वे स्टेशनवर अचंबित करणारी घटना घडली आहे. नुकताच पुणे रेल्वे स्टेशनवरील हाणामारीचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला होता. अशातच आता पुणे रेल्वे स्थानकावर पनवेल-नांदेड एक्सप्रेस (Panvel To Nanded Train) थांबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला कारण ठरलंय, झुरळ…

पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय.  या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय. पनवेल आणि मधल्या स्थानकांवर रेल्वेत बसलेले प्रवासी या झुरळांच्या सुळसुळाटामुळे हैराण झाले आहेत.  झुरळांचा बंदोबस्त झाल्याशिवाय रेल्वे पुढे न्यायची नाही अशी प्रवाशांची भूमिका घेतल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Related News

पनवेलवरुन दुपारी चार वाजता नांदेडला जाणारी ट्रेन निघाली. मात्र, थोडं अंतर पार केल्यानंतर एसी बोगीमधील प्रवाशांना झुरळांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे दीड ते दोन तास पुणे स्थानकामध्ये रेल्वे रोखून धरण्यात आलेली होती. एसीबी बोगीमधील झुरळांचा सुळसुळाट झाल्याचं पहायला मिळतंय. व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ट्रेनमधून लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीही प्रवास असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा Video

दरम्यान,  वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडल्याने खळबळ उडाली होती. एका प्रवाशाने जेवणाची ऑर्डर दिली होती, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तर, काही तासांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशनवरील दोन तरुणांच्या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. अशातच आता झुरळांनी रेल्वे प्रशासनाची चांगलीच झोप उडवली आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *