पुणे पोलिसांचा स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने गौरव: दिल्लीतील फिक्की हाऊस येथे पार पडला सोहळा; उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Police Felicitated With Smart Policing Award | The Ceremony Was Held At Fikki House In Delhi; Honored For Outstanding Service

पुणे7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथील फिक्की हाऊस येथे झालेल्या समारंभात पुणे पोलिसांना ‘सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टिम असिस्टन्स’-सेवा या उपक्रमासाठी एफआयसीसीआय स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार पुणे पोलिसांनी उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी प्रदान करण्यात आला. यासाठी काम करणार्‍या सर्व परिमंडळ, युनिटचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी अभिनंदन केले. पोलिस आयुक्त कार्यालयात मिळालेले सन्मान चिन्ह प्रातिनिधीक स्वरूपात परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांना देऊन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गौरव केला. यावेळी अपर पोलिस आयुक्त प्रविण कुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल उपस्थित होते.

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरूण ठार

भरधाव अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरूण ठार झाला. हा अपघात हडपसरमधील सिरम कंपनीच्या गेटक्रमांक चारजवळ घडला आहे. प्रणव श्रीकृष्ण केळेकर( वय २७ रा. हडपसर) असे अपघातात ठार झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी मधुरा केळेकर (वय ३० रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मधुरा यांचे भाउ प्रणव हे हडपसरमधील सिरम कंपनीच्या गेटजवळून पायी चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनचालकाने प्रणवला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या प्रणवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे तपास करीत आहेत.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *