Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो,” असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारचं चुकलं हे निश्चित
“या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याच आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित,” असं राज यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?
पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, “इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं,” असंही राज यांनी म्हटलं आहे.
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
नांदेड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क एका आमदाराने (MLA) पोलीस (Police) अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे. विना नंबरची दुचाकी सोडून देण्याची मागणी आमदाराने केली होती, मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने या...
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
“मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत,” असं म्हणत राज ठाकरेंनी आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सरकार पाडण्याची खुमखुमी मिटली
“काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे,” असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की…
“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील,” असा विश्वास राज ठाकरेंनी मराठा सामाजातील आंदोलकांना दिला आहे.