Raj Thackeray | ‘माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर….’, राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!

Raj Thackeray Speech Video: मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) दुरावस्थेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा (Kokan Jagaryatra) काढली. दुपारी साडेपाच वाजता ही यात्रा नवी मुंबईमध्ये पोहोचली. पदयात्रेच्या स्वागतासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. 

माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर मी देखील चाललो असतो. तुमच्या लोकप्रतिनिधींकडे पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंपनच शेत खातंय, तुमच्या जमिनी विकाव्या म्हणून हा महामार्ग होत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. व्यापाऱ्यांच्या हाताखाली जमिनी लावून देऊ नका. त्यांना काय रट्टे देयचेत ते आम्ही देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तुमच्या जमिनी विकू नका, बाकी काय ते आम्ही बघू, तुम्हीही जागृक राहिलं पाहिजे, असा सल्ला राज ठाकरे यांनी कोकणवासियांना दिला आहे.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी येत नसतो. माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस चौकीत अंडरवेअरवर बसवलं. अंडरवेअरची रिटर्न घेऊन मी पण देऊ शकतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबई नाशिक रस्त्याची परिस्थिती देखील तीच आहे. गेल्या काही वर्षात 15,666 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एवढे पैसे कशाला म्हणतात. साडेसहा कोटी रूपयांमध्ये चांद्रयान गेलं. त्याचं काय झालं मला माहिती नाही. चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यात काय अर्थ आहे, तुम्हाला आजपर्यंत लुटलं गेलंय. त्यांनाच तुम्ही सत्ता दिलीये. त्यामुळे तुम्ही जागृत रहा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Related News

पाहा Video

मुंबई गोवा रस्त्यावर 2500 लोकांचे अपघाती मृत्यू झालेत. खड्डा भरता येईल पण आयुष्याचं काय? इतकी वर्ष आम्ही काय भोगतोय, त्याचा विचार पण करायचं नाही. पैसे किती खायचे, त्याला काही मर्यादा आहे की नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. या महाराष्ट्राने प्रत्येकाला मार्गदर्शन केलंय. नितिन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई पुणे रस्ता झाला. तेव्हा देशाला कळालं की असा रस्ता तयार केला जाऊ शकतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.  Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *