मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणारे राजेश टोपे पोलिसांच्या ताब्यात

Marathwada Water Issue Protest : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली आहे. तर, पोलिसांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह 50 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून जालना रोडवर हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा लक्षात घेत पोलिसांनी हस्तक्षेप करत यापूर्वी माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता साडेचार तासांनी पोलिसांनी राजेश टोपे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 50 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. 

मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात जनआंदोलनाची हाक देण्यात आली होती. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासनाच्या विरोधात मराठवाड्यातील मंत्री, सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक संस्थां, पाणी वापर सहकारी संस्थांकडून आज आंदोलन केले जाणार होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर या आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरच रास्ता रोको सुरु केले.  या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे हजर होते. दरम्यान, पोलिसांनी टप्या-टप्प्याने आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Related News

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *