मुंबई18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील वाद वाद चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यावर शिस्तपालन समितीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला तुपकर उपस्थित राहिले नाही. त्यामुळे समितीने त्यांना आता 15 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. त्या नंतर तुपकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील शीतयुद्ध सुरू असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. रविकांत तुपकर हे या संघटनेवरच दावा करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक पुण्यात पार पडली. मात्र, रविकांत तुपकर हे या बैठकीला गैरहजर राहिले.
पंधरा ऑगस्टची डेडलाईन
पक्षाच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला तुपकर गैरहजर राहिल्याने त्यांची बाजू ऐकूण घेण्यासाठी समितीनी तुपकर यांना पंधरा ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. त्या आधी तुपकर यांनी भूमिका मांडावी असेही या समितीने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात वाद मिटतो की आणखी चिघळतो, हे पाहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण
राजू शेट्टी यांनी दौऱ्यात आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत तुपकर यांनी शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर तुपकर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिट्टी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच तुपकर यांना भाजपने खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.