पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र येथे रक्षाबंधन साजरा: एक राखी आजी-माजी सैनिकांसाठी; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचा अनोखा उपक्रम

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Celebrating Raksha Bandhan At Paraplegic Rehabilitation Center A Rakhi For Grandparents And Ex Servicemen; A Unique Initiative Of Nationalist Congress Party Sainik Cell

पुणे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सीमेवर राहून देशाचे संरक्षण करणारे जवान यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येक नागरीकांना असली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या प्रती नैतिक, सामाजिक, मानसिक, आणि साधनसामग्रीने बंधु आणि भगिनीभाव आपण जपला पाहिजे. या भावनेने भारतीय सैनिकांनसाठीचे पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र खडकी कॅम्प येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेलच्या वतीने आजी- माजी सैनिक भावांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सैनिक सेलचे मार्गदर्शक, 1971 लढाईचे युद्ध हीरो कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेलच्या राज्यप्रमुख आणि प्रदेशाध्यक्ष्या मेघा समीर कुलकर्णी यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला कर्नल मुखर्जी, कर्नल समीर कुलकर्णी व सैन्यातील वरीष्ठ अधिकारी, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक कप्तान वसंत आजमाने, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील कर्नल भारगवा, स्मिता माने, हलिमा शेख, प्रतिभा नवले यांची प्रमुख उपस्थिती सोबतच आजी माजी सैनिक, वीर पत्नी, वीर नारी, शाळेचे विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनोखे रक्षाबंधन

समाजरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असणारे पोलिस बांधव पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षांना राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी राबविला.पर्वती पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बांधवांबरोबर रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आम्ही सदैव तुमच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पोलिस बांधवानी यावेळी दिली. याप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त सिंहगड विभाग शेवाळे साहेब, पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे ,गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे, सहायक फौजदार बाबा कदम व पोलिस बांधव उपस्थित होते. त्यानंतर राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलसमोरील वृक्षाला राखी बांधून पर्यावरणासाठी कटिबद्ध होऊ या , वसुंधरा वाचविण्यासाठी कृतिशील होऊ याचा निर्धार केला.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *