आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक, रविकांत तूपकरांच्या दंडाला पकडून विचारला जाब

लातूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राज्यभरात गावागावात आंदोलन सुरु आहे. तर, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरातील अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना देखील अशाच रोषाला सामोरे जावे लागले. बैठकीसाठी आलेल्या रविकांत तुपकर यांच्या दंडाला पकडून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. शेवटी तुपकर यांना नियोजित बैठक आणि पत्रकार परिषद रद्द करून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. 

रविकांत तुपकर हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लातूरच्या विश्रामगृह येथे आज कार्यकर्त्याची बैठक होती. सततची नापिकी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर येत्या काळात काय भूमिका घेता येईल आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार होती. यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तुपकर विश्रामगृहात पोहचले होते. मात्र, यावेळी त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला.

Related News

तूपकरांच्या दंडाला पकडून विचारला जाब

रविकांत तुपकर विश्रामगृहात पोहचताच सकल मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत विश्रामगरात दाखल झाले. रविकांत तुपकर यांना इथे का आलात असा जाब विचारण्यात आला. अक्षरशः आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रविकांत तुपकर यांच्या दंडाला धरत त्यांना जाब विचारला. बराच काळ रविकांत तुपकर हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आक्रमक झालेले आंदोलकांनी काहीही ऐकण्यास नकार दिला. शेवटी नियोजित बैठक आणि त्यानंतरची पत्रकार परिषद रद्द करत रविकांत तुपकर हे विश्रामगरातून निघून गेले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, परिस्थिती पाहता तुपकर यांनी काढता पाय घेतला आणि वातावरण निवळले. 

मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारल्या…

लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. तर, आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान, प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात केला. मात्र, आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून उतरलेले काही तरुण बाहेर यायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *