विक्रमांचा क्रिकेट विश्वचषक: तब्बल 5.42 लाख प्रेक्षक,  मागील विश्वचषकापेक्षा तिप्पट, मैदानापासून मोबाइलवरही प्रचंड गर्दी

दिव्य मराठी नेटवर्क | अहमदाबाद10 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतातील क्रिकेट विश्वचषकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आयसीसीनुसार, आतापर्यंत १८ सामन्यांमध्ये ५.४२ लाख क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. गेल्या विश्वचषकादरम्यान इतक्याच सामन्यांना १.९० लाख प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. आतापर्यंत एकूण ३६.४२ कोटी प्रेक्षकांनी थेट प्रक्षेपण पाहिले.

Related News

धर्मशालात ‘ऑनलाइन’ सामन्याचा विक्रम

भारत-पाकिस्तान यांच्यात १४ रोजी अहमदाबादमध्ये झालेला सामना ७.६ कोटी प्रेक्षकांनी टीव्हीवर आणि ३.५ कोटी प्रेक्षकांनी मोबाइलवर पाहिला. २२ रोजी धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड सामन्यात नवा विश्वविक्रम झाला. हा सामना ४.३ कोटी प्रेक्षकांनी मोबाइलवर पाहिला. मोबाइलवर सामना पाहण्याचा हा विक्रम आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काैन्सिल (बार्क)च्या आकड्यांनुसार, आतापर्यंतचे १८ सामने टीव्हीवर १२,३८० कोटी मिनटे लाइव्ह पाहिले गेले. २०१९ मध्ये इंग्लंड आणि मागील वर्ल्डकपपेक्षा हे प्रमाण ४३% अधिक आहे.

डिजिटल सहभागाचा सर्वोत्कृष्ट विश्वचषक

डिजिटल सहभागाच्या दृष्टीने हा आयसीसीचा सर्वोत्तम विश्वचषक. २०२२ च्या टी-२० विश्वचषकाचा विक्रमही त्याने मोडला. संपूर्ण टी-२० वर्ल्डकपला ६५८ कोटी व्हिडिओ व्ह्यूज मिळाले, तर आता ६६४ कोटी व्हिडिओ व्ह्यूज मिळाले. हे टी-२० विश्वचषकापेक्षा १२७%, २०१९ च्या विश्वचषकापेक्षा ३१४% जास्त आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *