रोहित पवारांची राष्ट्रवादीत वाढतेय ताकद: सुप्रिया सुळेंसोबत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीत पुढाकार, राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन झाल्याची चर्चा

मुंबई27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार खासदार सु्प्रिया सुळे यांच्यासोबत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related News

रोहित पवार यांनी ट्विटरवर काही फोटो ट्विट केलेत. त्यात ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राजद अध्यक्ष लालुप्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेताना दिसून येत आहेत. या फोटोत खासदार सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवारांची ओळख करून देताना दिसून येत आहेत. विशेषतः रोहित या नेत्यांशी आपुलकीने जवळीक साधत असल्याचेही दिसून येत आहे.

रोहित पवार इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. विशेषतः खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी खास पुढाकार घेतल्यामुळे रोहित पवार भविष्यात राष्ट्रीय राजकारण दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको.

शरद पवारांची साथ देण्यास पसंती

उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. सध्या ते महाराष्ट्रभर दौरे करून पवारांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर ते अजित पवार यांची जागा घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची टीका केली आहे.

रोहित पवार यांचा सर्वच क्षेत्रांत वावर

रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू, तर अजित पवार यांचे पुतणे आहेत. ते कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करतात. ते नेहमीच आपल्या मतदार संघातील कामे, सहकारी व सत्ताधारी पक्षांतील नेत्यांशी सुसंवाद साधताना दिसून येतात. याशिवाय, संगीत, कला, शिक्षण आदी जवळपास सर्वच क्षेत्रातील मातब्ब व्यक्तींसोबतही त्यांचा वावर दिसून येतो.

खाली पाहा रोहित पवारांच्या भेटीगाठीचे फोटो…

रोहित पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत.

रोहित पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत.

रोहित पवार, राजद अध्यक्ष लालुप्रसाद यादव, सुप्रिया सुळे व तेजस्वी यादव.

रोहित पवार, राजद अध्यक्ष लालुप्रसाद यादव, सुप्रिया सुळे व तेजस्वी यादव.

रोहित पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांशी हस्तांदोलन करताना.

रोहित पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांशी हस्तांदोलन करताना.

रोहित पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना. सोबत खासदार सुप्रिया सुळे.

रोहित पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना. सोबत खासदार सुप्रिया सुळे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *