Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार ‘हे’ तीन महाविक्रम

Rohit Sharma, IND vs ENG: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाची (Team India) कामगिरी दमदार झाली आहे. टीम इंडिया सलग पाच सामने जिंकत स्पर्धेत आतापर्यंत अपारिजत राहिली आहे. आता सहाव्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड (India vs England) आमने सामने येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे. या सामन्यात तीन मोठे विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर जमा होणार आहेत. 

कर्णधार म्हणून 100 वा सामना
रोहित शर्माने 2017 मध्ये टीम इंडियाची कमान आपल्या हात घेतली. पण त्यावेळी तो नियमित कर्णधार नव्हता. विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटच्या तीन फॉर्मेसाठी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात आतापर्यंत 99 सामने खेळलीय. आयसीसी विश्वचषकात इंग्लंडविरुद्धचा सामना रोहित शर्माचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. 

18 हजार धावांपासून काही पावलं दूर
हिटमॅन अर्थात रोहित शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 17953 धावा केल्या आहेत. त्यामुळे 18,000 आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी रोहित शर्माला आता केवळ 47 धावांची गरज आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहित शर्मासाठी 47 धावा हे मोठं आव्हान नाहीए. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो हा विक्रम सहज पूर्ण करेल. 18,000 आंतरराष्ट्रीय धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी हा टप्पा पार केला आहे. 

Related News

विश्वचषकात सर्वाधिक षटकार
विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्माने 17 षटकार लगावले आहेत. आतापर्यंतच्या विश्वचषक सामन्यात रोहित शर्माच्या नावावर 40 षटकार जमा झालेत. विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने 49 षटकार लगावले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा गेलचा हा विक्रम मागे टाकणार का याकडेही भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकरांचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. यातही रोहितने ख्रिस गेलला मागे टाकलंय.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *