Rohit Sharma On T20 Retirement: टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म गडगडला आहे. गेल्या काही लिमिटेड ओव्हर सामन्यात रोहित शर्माला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटला (Rohit Sharma T20 Retirement) रामराम ठोकणार अशा चर्चांना उधान आलंय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा झालाय. त्यामुळे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज चाहत्यांनी बांधला जात असतानाच आता रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
तुम्हाला सर्वांना माहितीये की, येत्या काळात विश्वचषक येत आहे हे तुम्हाला माहीतच आहे. जूनमध्ये इथे (अमेरिकेत) वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे, मला खात्री आहे की प्रत्येकजण याबद्दल उत्सुक आहे. होय, आम्ही देखील त्याची वाट पाहत आहोत, असं म्हणत रोहित शर्माने आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळण्याचे संकेत दिले आहेत.
क्रिक किंगडम क्रिकेट अकादमी
वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर रोहित शर्मा अमेरिकेला रवाना झाला होता, जिथे त्यानं 5 ऑगस्ट रोजी स्वतःची ‘क्रिक किंगडम’ नावाची (Crick Kingdom Cricket Academy) क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. त्यामुळे आता त्याने निवृत्तीची तयारीही सुरू केली आहे, अशी कुजबुज सुरू झाली होती. नुकतंच वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहितने शतक झळकावलं होतं. तरी रोहित शर्मा त्याचं वाढतं वय पाहता क्रिकेट जगतातून निवृत्ती घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होती. त्यावर आता त्याने स्वत: फुल स्टॉप लगावला आहे.
Related News
Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही…तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी
IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल
ICC World Cup : एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो…
‘…तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल’; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी
तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर
बाऊंड्रीलाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा ‘हा’ माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?
AUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
बापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, ‘हा घाणेरडा माणूस’
World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो…
रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो ‘मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..’
भारताची विश्वचषक जर्सी लाँच झाली: खांद्यावर तिरंगा रंग, ‘3 का ड्रीम है अपना’ थीम साँगमध्येही दिसले रोहित-कोहली
दरम्यान, 2021 मध्ये टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर रोहितने संघात मोठे बदल केले. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर बीसीसीआयने सुत्र हातात घेऊन हार्दिक पांड्याकडे टी-ट्वेंटी संघाचं नेतृत्व दिलं आहे.