दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूंना बसवणार बाहेर

IND vs SA Probable Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत खेळणारी टीम इंडिया (Team India) जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व सातही सामन्यात विजय मिळवलाय. या स्पर्धेत अपराजीत असलेला भारत हा एकमेव संघ आहे. विजयाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन (Eden Gardens) मैदानावर उतरेल. पण यावेळी भारताचा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी आहे (India vs South Africa). दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत सात सामन्यात केवळ एक पराभव स्विकारला आहे आणि पॉईंटटेबलमध्ये दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया चांगली फॉर्मात असून सेमीफायनलमधलं आपलं स्थानही निश्चित केलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे या संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यांमुळे त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार?
हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे संघाचा बॅलेन्स काहीसा बिघडला आहे. टीम इंडियाला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरावं लागंतय. पण यानंतरही टीम इंडियाची कामगिरी दमदार होतेय. गेल्या सातही सामन्यात फलंदाजांची कामगिरी जबरदस्त झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. पण एकूणच स्पर्धेत त्याची कामगिरी जबरदस्त झालीय. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवही चमकला होता. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत कोणताही बदल होण्याची शक्यता कमीच आहे. 

Related News

पण टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्याने रोहित शर्मा काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारच्या जागी पाचव्या क्रमांकावर ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

गोलंदाजीत होणार बदल?
फलंदाजीबरोबरच टीम इंडियाची गोलंदाजीही दमदार होतेय. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे वेवगान त्रिकुट भलतंच फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात या वेगवान त्रिकुटाने श्रीलंकेला अवघ्या 55 धावात गुंडाळलं होतं. पण सेमीफायनलचा विचार करता प्रमुख गोलंदाज बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याचाजागी संघात ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कुलदीप यादव किंवा रविंद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाला आराम देऊन आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा/ रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह/शार्दुल ठाकुर.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *