Asia Cup 2023 : फायनलमध्ये भारत-पाक खेळताना दिसणार…; प्रेस कॉन्फ्रेंस रोहित शर्माचं मोठं विधान

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 ( Asia Cup 2023 ) सुरु झाली असून टीम इंडिया त्यांचा पहिला सामना शनिवारी खेळणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना श्रीलंकेत रंगणार आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना सुरु होणार असून सर्व चाहत्यांना याची उत्सुकता आहे. दरम्यान या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माची ( Rohit sharma ) प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. 

यावेळी रोहित शर्मा ( Rohit sharma ) ने टीम इंडियातील खेळाडूंची दुखापत, टीमची रणनीती आणि सुरु असलेली तयारी यावर भाष्य केलं आहे. दरम्यान याबाबत फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळताना दिसू शकते, असे संकेतंही रोहित शर्माने दिलेत.

भारत-पाकिस्तान येणार फायनलमध्ये?

आतापर्यंत एकदाही भारत पाकिस्तान आशिया कपच्या फायनलमध्ये लढले नाहीत. यावर एका पत्रकाराने रोहितला भारत-पाक यंदा फायनलमध्ये भिडणार का, असा सवाल केला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा ( Rohit sharma ) म्हणाला की, यंदाच्या टूर्नामेंटमध्ये तुम्हाला ते देखील पहायला मिळू शकतं. एशिया कप एक मोठी स्पर्धा आहे. याचा अर्थ, भारत-पाकिस्तान यंदाच्या एशिया कपमध्ये फायनल सामन्यात आमने-सामने येतील, असा रोहित शर्मा ( Rohit sharma ) चा विश्वास आहे. 

Related News

पाकिस्तानविरूद्ध टीममध्ये कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये जागा मिळणार याबाबत रोहित ( Rohit sharma ) म्हणाला, आमच्याकडे बरेच टॅलेंटेड प्लेअर्स आहेत. त्यामुळे अनेकदा प्लेईंग 11 निवडणं कठीण होतं. या स्पर्धेत कोणत्याही टीमला कमजोर समजू शकत नाही. कोणतीही टीम कोणत्याही टीमला हरवू शकते. त्यामुळे आम्हाला प्रत्येक चूकीतून शिकावं लागणार आहे. 

पाकिस्तानविरूद्ध कशी असणारे टीम इंडिया ( Team India ) ची स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव. प्रसिद्ध कृष्णा संजू सॅमसन

पाकिस्तानची स्क्वॉड

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमामुल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह , शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तयेब ताहिर



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *