तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर

India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामन्याकडे विश्वचषकापूर्वीची (ICC ODI World Cup 2023) तयारी म्हणून पाहिलं जात आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया संपूर्ण ताकदीनिशी खेळणार आहेत. 

हे खेळाडू संघात
तिसऱ्या एकदिवसयी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) हार्दिक पांड्या (Hardik Pandya), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या खेळाडूंचं पुनरामन होणार आहे. त्यामुळे ईशान किशन, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंना बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. राजकोटची खेळपट्टी इंदौरसारखं हायस्कोरिंग आहे. त्यामुळे सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनसह टीम इंडिया मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल.

सलामीची जोडी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि जबरदस्त फॉर्मात असलेला शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात करतील.पहिल्या दहा षटकात आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या वाढवण्यात हे दोनही फलंदाज माहिर आहेत. 

Related News

मधली फळी
तिसऱ्या क्रमांकावर स्टार फलंदाज विराट कोहलीची जागा निश्चित आहेत. तर चार नंबरला विकेटकिपर फलंदाजी केएल राहुल फलंदाजीला उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये नंबर पाचला सूर्यकुमार यादव फलंदाजीला येत धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करेल.

अष्टपैलू खेळाडू
टीम इंडियात दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. यापैकी उपकर्णधार हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर तर रविंद्र जडेजा सातव्या क्रमंकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. 

फिरकी गोलंदाज
टीम इंडियाचा अनुभवी दिग्गज गोलंदाज आर अश्विनला फिरकी गोलंदाजीची संधी मिळेल. अक्षर पटेलऐवजी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातही अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

वेगवान गोलंदाज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज असे भारताचं स्टार वेगवान त्रिकुट मैदानात उतरणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *