घाटीतल्या अस्वच्छतेवरुन रुपाली चाकणकर संतापल्या: जिल्हाधिकारी ते थेट वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना फोन; रुग्णसेवा चांगली पण अस्वच्छतेवर बोट

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Rupali Chakankar Is Angry About Unsanitary Conditions In GHATI Hospital Auranagbad | Direct Phone Call From The District Collector And Medical Education Minister

औरंगाबाद6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

घाटीतल्या अस्वच्छतेवरुन कायम टिका केली जाते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील याचा प्रत्यय आला. जालनामधील जखमी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आल्या असता त्यांनी प्रसुती आणि बालरोग विभागात भेट घेतली. यावेळी सर्जरी इमारतीमध्ये गेल्यानंतर त्यांना अस्वच्छता पहायला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या चाकणकर यांनी थेट जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनाच फोन करत नााराजी व्यक्त केली. यावेळी लोकांनी देखील स्वच्छता बाळगायला हवी असे चाकणकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

जखमींना भेटण्यासाठी गेल्या रुग्णालयात

चाकणकर यांनी जालनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात जखमींना भेटण्यासाठी खाजगी हॉस्पीटल आणि घाटी अश्या दोन रुग्णालयात भेट दिली. यावेळी घाटीच्या भेटीच्या वेळी त्यांनी संबधीत रुग्णांची डॉक्टराकडे विचारपुस केली. त्यानंतर डॉक्टरासोबच चर्चा केल्यानंतर त्यांनी इतर दोन विभागाची पाहणी केली.

इमारतीत सर्वत्र अस्वच्छता

चाकणकर यांनी इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सर्वत्र तंबाखुने थुंकलेले चित्र पहायला मिळाले. तसेच काही ठिकाणी खरकटे पडलेले चित्र पहायला मिळाले.त्यामुळे इतकी अस्वच्छता कशी आहे असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना देखील फोन लावला आणि इथल्या अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन लावत अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच घाटीला रिक्त जागेच्या तसेच चतुर्थ श्रेणीची पदे भरा अशी मागणी त्यांनी केली.

एकाच बेडवर पहायला मिळाले दोन रुग्ण

यावेळी बालरोग विभागात गेल्यानंतर त्यांना एकाच बेडवर दोन रुग्ण पहायला मिळाले. तर प्रसुती विभागातही महिलांची गर्दी पहायला मिळाली. तसेच अस्वच्छता पहायला मिळाली. त्यानंतर त्यांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सेवेबाबत विचारले असता रुग्णांनी आम्हाला इथे चांगली सेवा मिळते असे सांगितले.घाटीच्या प्रसुती विभागात ९० बेड असतांना दिडशे पेक्षा आधिक महिला येतात.त्यामुळे कायम गर्दी असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कल्याणकर यांनी सांगितले.तसेच घाटीची चतुर्थश्रेणीची पुर्वी सातशे असलेली पदे आता केवळ चारशे असून रिक्त पदामुळे कश्या अडचणी येतात हे त्यांनी सांगितले.तसेच घाटीत रुग्णांची संख्या वाढत असतांना स्टाफ कमी होत असल्याची गोष्ट देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *