स्वराज्य पक्षाची सांगोल्यात सभा: राज्यातील जनतेसाठी आम्ही वेगळा पर्याय घेऊन आलोय, संभाजीराजे छत्रपतींचे प्रतिपादन

सांगोला9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पहिली भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती होती. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली. आता शिवसेना अन् राष्ट्रवादी सत्तेत आणि विरोधात देखील आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आणि नेत्याकडून दुसऱ्या पक्ष आणि नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळी सोडून बोलत असल्याचे मत स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

Related News

गाव तेथे शाखा आणि घर तेथे स्वराज्य शाखांच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे रविवार ६ ऑगस्ट रोजी सांगोल्यात आले होते. दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते बोलताना पुढे म्हणाले २००७ पासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छ.शाहू महाराजांचा विचार घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला आहे. गाव तेथे घर तेथे स्वराज्य हा संकल्प घेवून महाराष्ट्रात फिरत आहे. मी जनतेला एक वेगळा पर्याय घेवून आलो आहे. स्वराज्याच्या माध्यमातून सामान्य माणूस असामान्य काम करू शकतो. शेवट पर्यंत संघर्ष करायचा ही आमच्या घराण्याची शिकवण आहे. लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी अहोरात्र दौरे करीत आहे.

प्रास्ताविक करताना अरविंद केदार म्हणाले, कोणाला सत्तेत बघायचे आणि कोणाला विरोधात अशी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. युवक बेरोजगार झाला असून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून तरुणांना दिशा देण्याचे काम छत्रपती संभाजीराजे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख महादेव तळेकर, धनंजय जाधव, करण गायकर, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर, अरविंद केदार, संपर्क प्रमुख करण गायकर, महेश गवळी, सचिन महांकाळ, विशाल केदार, रणजित काळे, गणेश माने यांच्यासह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांची स्थिती पाहून अस्वस्थ झालोय, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मी खूपच अस्वस्थ झालो. खासदार, आमदारांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. दीड वर्षापासून किसान रेल्वे बंद असल्याने खासदारांनी संसदेत रेल्वेचा प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला. वेळप्रसंगी मी सोबत येण्यास तयार आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध नाहीत. मतदारांनी जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मतदान करावे असे आवाहन स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *