सांगली: १९६७ पूर्वी ज्यांच्या नावावर शेती, त्यांना कुणबी दाखला द्या: अॕड. संदीप मुळीक | महातंत्र

विटा: महातंत्र वृत्तसेवा : ज्यांच्या नावे १९६७ पूर्वी शेती आहे, जो शेती करत होता, याचा पुरावा सादर करेल, त्यांना कुणबी म्हणून ओबीसींचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी अॕड. संदीप मुळीक यांनी केली आहे. (Maratha Reservation)

सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे. मराठा समाजाला कुणबी दाखला देऊन ओबीसींचे सर्व लाभ मिळावेत, अशी मागणी केली जात आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुसंख्य मराठा लोकांची कुणबी म्हणून नोंद आहे. मात्र, अशी महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद आढळत नाही. यावर अॕड.संदीप मुळीक यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी अॕड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर आणि मनोज देवकर उपस्थित होते. (Maratha Reservation)

यावेळी अॕड.संदीप मुळीक म्हणाले, स्वातं त्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश होता. १८८५ च्या सातारा गॅझेटिअर मधील नोंदी नुसार १८८१ च्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ६२ हजार ८५० इतकी होती. त्यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या ५ लाख ८३ हजार ५६९ इतकी होती. या जनगणनेत मराठा समाजाची स्वतंत्र जनगणना केलेली नव्हती. १८८५ च्या सातारा गॅझेटिअर मधील नोंदीनुसार कुणबी ही जात व्यवसाय वाचक आहे.

शेती करणारा कुणबी असा अर्थ आहे. तथापि विसाव्या शतकात जिल्ह्यात कुणबी जातीचे स्वतंत्र अस्तित्व आढळून येत नसून ती मराठा जातीअंतर्गत लोप पावली असल्याचे आढळते. सध्याच्या वातावरणात ओबीसी समाजामध्ये एकप्रकारचा संभ्रम निर्माण केला जात आहे. धनगर समाजाला एनटी-२ मध्ये ३.५ टक्के, वंजारी समाजाला एनटी-३ मध्ये वस्तुतः आहे. २ टक्के, एसबीसी मध्ये कोष्टी वगैरे समाजाला २ टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. सध्या ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणात कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, लेवा- पाटील वगैरे जातीच्या विदर्भ, जळगाव, नांदेड, नाशिक याभागातील मराठा समाजाचा म्हणजे च जवळपास ५० टक्के समाजाचा समावेश आहे.

आता फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा या भागातील उर्वरित मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास इतर जातींना फार मोठा फरक पडणार नाही. कुणबी समाज हा व्यवसायवाचक समाज आहे. सध्या ओबीसी वगैरे जात पडताळणीसाठी १९६७ पूर्वीचा पुरावा द्यावा लागतो. त्याच पद्धतीने १९६७ पूर्वी ज्यांच्या नावे शेती आहे, जो शेती करत होता, याचा पुरावा सादर करेल, त्यांना कुणबी म्हणून ओबीसींचा दाखला देण्यात यावा, असेही अॕड. संदीप मुळीक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *