मोहम्मद शमीमुळे ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात, संजय मांजरेकर यांच्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!

Sanjay Manjrekar on Mohammed Shami : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे (IND vs ENG) फलंदाज पूर्णपणे फेल ठरल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाची रनमशिन फेल ठरल्याने फलंदाजीचा कस लागला होता. मात्र, रोहित शर्मा वळता कोणताही फलंदाज मैदानात जास्त वेळ टीकू शकला नाही. मात्र, खरी परीक्षा होती ती गोलंदाजांची… टीम इंडियाचे गोलंदाज परीक्षेत पास झाले. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि बुमराह यांनी सुरूवातीच्या विकेट्स खोलून ठेवल्या तर कुलदीपने (Kuldeep Yadav) देखील फिरकीची जादू दाखवली. सामन्यात सर्वात निर्णायक ठकला तो मोहम्मद शमी. शमीने इंग्लंडविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या, तर न्यूझीलंडविरुद्ध शमीने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे सिलेक्टर्स शमीवर खुश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच शमीच्या या प्रदर्शनामुळे टीम इंडियामधील एका खेळाडूची जागा धोक्यात आलीये, अशी चर्चा सुरू झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आता टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.  

काय म्हणाले Sanjay Manjrekar ?

मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे आता संघ व्यवस्थापनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. वास्तविक पाहिलं तर, आता प्रत्येक सामन्यात 3 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार का? याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. नाही तर आता सिराजची जागा संघात होणार का? कारण शमीने त्याचं काम केलंय. त्यामुळे आता सिराज खेळणार की शमी? असा सवाल संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.

झालं असं की, हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर संघाला मोठा धक्का बसला. एक ऑलराऊंडर खेळाडू संघाबाहेर जाणं हा वर्ल्ड कपमधील हा संघासाठी सेटबॅक होता. त्याचवेळी रोहितने प्लॅन फिरवला. रोहित शर्माने इशान किशनला संघाबाहेर काढलं अन् सूर्यकुमार यादवची एन्ट्री केली. तर दुसरीकडे बॉलिंग लाईन अपमध्ये शमीला स्थान दिलं. त्यामुळे परफेक्ट बॅटिंग आणि बॉलिंग लाईन अप संघाला मिळाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, जर आता हार्दिक पांड्या नेमका सेमीफायनलला संघात परत आला तर बॉलिंग डिपार्टमेंटमधून कोणाला संधी मिळणार? हा देखील मोठा प्रश्न आहे.

Related News

आणखी वाचा – ना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो ‘हा’ क्रिकेटर

दरम्यान, रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये मोठे बदल केल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे हार्दिक आला तर सिराज संघात कमबॅक करेल, याची शक्यता जास्त आहे. शमीने मागील 2 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तर सिराजला मागील दोन सामन्यात फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे पारडं शमीच्या बाजूने झुकलंय. त्यामुळे, रोहित शर्मा टीमचा बॅलेन्स कसा साधणार? यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *