संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी: नीतेश राणेंचे दहशतवाद विरोधी पथकाला पत्र, म्हणाले- राऊतांची देशविरोधी संघटनेशी जवळीक

मुंबई5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची देशविरोधी संघटनेशी जवळीक असावी. भारताविरोधात रचल्या जाणाऱ्या संभाव्य षड्यंत्रांचा ते भाग असावेत, असा गंभीर आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नीतेश राणेंनी केली आहे. यासंदर्भात नीतेश राणेंनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांना पत्र पाठवले आहे.

Related News

सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न

पत्रात नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्र जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रीयेतून शांततेत सोडवला गेला आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने आनंदाने पुर्णत्वास जात आहे. लोकापर्ण सोहळा तारीख जशी जशी जवळ येतेय तसा देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमी राज्यसभेचे खासदार व सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत हे मे २०२२ पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील अशा वारंवार बातम्या माध्यमातून पसरवत आहेत.

राऊतांच्या विधानामुळे मी चिंतेत

नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांच्या विधानानंतरच महाराष्ट्रात अचानक काही लोकांनी औंरगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आणि त्यामुळे काही भागात दंगलीसुद्धा घडल्या. त्यामुळेच काल 28 ऑगस्ट 2023 रोजी राऊत यांनी माध्यमांपुढे विधान केले की “राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल.’’ त्यामुळेच संजय राऊतांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे आहे.

संभाव्य दंगलीची अचूक माहिती घ्यावी

नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, मला खात्री आहे की देशविरोधक संघटनेशी संजय राऊतांची जवळीक असावी आणि भारत देशाविरूद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणाऱ्या षढयंत्रांचा ते भाग असावेत. म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे. संजय राऊत यांच्यावर मनी लॉंड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या वृत्तींना ते आपला आदर्श समजतात. यापुढे नीतेश राणे एटीएस प्रमुखांना विनंती केली आहे की, संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी आणि आवश्यकता वाटल्यास न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांची नार्को टेस्टही करावी. जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल.

हेही वाचा,

भाजप आमदार नीतेश राणेंची बोचरी टीका:सुनील राऊतांना 100 कोटी काय, कुणी 100 रुपयांचीही ऑफर देणार नाही, दोघे राऊत बंधू खोटारडे

माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड आहे. त्यामुळेच शिवसेनेतून फुटण्यासाठी मला 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती आणि ही ऑफर अजूनही कायम आहे, असा दावा संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. त्यावर सुनील राऊत यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कोणी 100 कोटी काय, 100 रुपयेही देणार नाही, अशी बोचरी टीका भाजप आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *