मुंबई11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येपूर्वी थकीत कर्जाच्या बाबतीत काही मदत मिळावी म्हणून नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सनी देओलला एका दिवसात न्याय
दुसरीकडे, याच भाजप नेत्यांनी पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या सनी देओलला बँकेने नोटीस पाठवल्यानंतर एका दिवसात दिलासा दिला. सनी देओलला भाजपने मदत केली, त्यामुळे बँकेने नोटीस मागे घेतली याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. पण, जो न्याय सनी देओलला दिला, तोच न्याय मराठी कलादिग्दर्शक असलेल्या नितीन देसाईंना का दिला नाही? असा सवाल संजय राऊतांनी भाजपला केला आहे.
देओल भाजपचे स्टार प्रचारक, म्हणूनच मदत
संजय राऊत म्हणाले, आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंनी भाजप नेत्यांकडे मदतीसाठी धाव घेतली होती. त्यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. दुसरीकडे, सनी देओलवरही मोठे कर्ज होते. त्यांच्या घराचा लिलाव करण्यासाठी बँक ऑफ दरोडाने त्यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते भाजपचे खासदार तसेच भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे बँकेने दुसऱ्याच दिवशी त्यांची नोटीस मागे घेतली. नितीन देसाई भाजपचे कोणी नव्हते, म्हणून त्यांची मदत केली नाही का?, असा सवाल करत याच गोष्टीने त्यांचा जीव घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.
भाजपसोबत असणाऱ्यांची कर्ज माफ
संजय राऊत म्हणाले, एका बाजूला देशातून हजारो कोटी रूपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत त्यांची कर्ज माफ होत आहेत आणि कारवाईही होत नाही. मात्र एक हरहुन्नरी मराठी माणूस ‘शे दीडशे’ रूपयाचे कर्ज आपण फेडू शकलो नाहीत. जे स्वप्न एन डी स्टुडिओच्या माध्यमातून उभे केले ते स्वप्न माझ्यासमोर विखुरताना दिसत आहे. हे सहन न झाल्यामुळे आत्महत्या करतो, ही अतिशय खेदाची बाब आहे.
हेही वाचा,
आज हिंगोलीत उद्धव ठाकरेंची निर्धार सभा:गड पुन्हा उभारू- ठाकरेंची साद; कोणाची किती ताकद कळेल, संतोष बांगरांचे प्रत्युत्तर

आज हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगरदेखील शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संतोष बांगर यांच्याविरोधात आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर