पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याची साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. साथ सर्वत्र पसरली असून 20 जुलैपासून शहरातील 5 हजार 67 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यात शाळेतील मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो व्हायरसमुळे होतो. रुग्ण वाढल्याने शहरात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवू लागला आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ आली आहे. सुरुवातीला आळंदीत साथ आली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ही साथ आली आहे. डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो व्हायरसमुळे होतो. हा आजार साथीचा आहे. त्यामुळे झपाट्याने त्याचा प्रसार होत आहे. महापालिकेने 20 जुलैपासून डोळे लागण होणा-या रुग्णांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. 20 जुलैपासून आता पर्यंत शहरातील 5 हजार 67 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शाळकरी मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना प्रादुर्भाव होत आहे.
पालिकेच्या उपाययोजना
प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये जास्त आहे . ज्या शाळेत पाचपेक्षा जास्त मुलांना प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे. शाळेने तपासणीस बोलविल्यास वैद्यकीय टीम शाळेत जावून मुलांची तपासणी करत आहे. ज्या भागात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्या भागाचा सर्व्हे केला जात आहे.
शहरात आय ड्रॉपचा तुटवडा
शहरात मोठ्या संख्येने या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आय ड्रॉपची मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने औषधांच्या दुकानात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत आहे. औषध दुकानदारांच्या विक्रेत्यांच्या मागणीनुसार औषधांचे होलसेल विक्रेते केवळ निम्म्याच औषधांचा पुरवठा करत आहेत. शहरातील होलसेल डीलरकडून मेडिकल विक्रेत्यांना केवळ एक हजार अँटिबायोटिक ड्रॉपची विभागणी करण्यात येत आहे.