Sharad Pawar : शिरूरचे सूर्यकांत पलांडे शरद पवार यांच्याकडे | महातंत्र
शिक्रापूर(पुणे); महातंत्र वृत्तसेवा : शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह पुण्यातील मोतीबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी रविवारी (दि. 27) पवार यांची भेट घेऊन आपण त्यांच्यासमवेत असल्याची ठामपणे ग्वाही दिली.आंबेगाव-शिरूर या मतदारसंघातील 39 गावांमधून पलांडे प्रतिनिधित्व करत असल्याने ते शरद पवार यांच्या सोबतीला गेले आहेत.
राज्याच्या प्रगतीमध्ये शरद पवार यांचा वाटा मोठा आहेच, परंतु शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पवार यांचे सर्वात जास्त योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणार्‍या घडामोडींमध्ये आबालवृद्धासह तरुणांचा शरद पवार यांच्यावर मोठा विश्वास आहे, अशी भावना पलांडे यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील सुमारे 100 प्रमुख कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवार यांच्याशी तालुक्यातील प्रश्नांसह शेतकर्‍यांशी निगडित ऊस व कांदा प्रश्नसंदर्भात चर्चा केली. घोडगंगा सहकारी कारखाना अडचणीत आला असून, त्यासंदर्भात मदत करण्याची मागणी केली. पवार यांनी याबाबत मदत करणार असल्याचे सांगत शेतकर्‍यांना उसाची एफआरपी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरू करावे व शासनाने चांगल्या दराने कांदा खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी कांदाप्रश्नी चर्चा झाल्याचे पलांडे यांनी सांगितले.

दोन माजी आमदार दोन गटांमध्ये

शिरूर तालुक्यातील दोन माजी आमदारांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार पोपटराव गावडे हे अजित पवार गटात असून, ते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आहेत, तर माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ठाम पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी आमदार आंबेगाव शिरूर मतदार संघातील 39 गावांमधून प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा

बेळगाव: हिरेकोडी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ८५ जण अत्यवस्थ

काळम्मावाडी आमची रक्तवाहिनी; सीमा भागातील नेत्यांच्या भावना

यंदाचा ऑगस्ट 123 वर्षांतील सर्वात कोरडा

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *