हातकणंगलेचा उमेदवार शरद पवार ठरवतील : जयंत पाटील | महातंत्र








जयसिंगपूर, महातंत्र वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. येणार्‍या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी पाठबळ देऊन गावागावांत पक्ष बळकट करावा. त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण, याचा निर्णय शरद पवार घेतील. त्यामुळे आपण सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

शिरोळ येथे आ. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा केली. स्वागत राष्ट्रवादीचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी करून तालुक्यात पक्ष वाढीबाबत सुरू असलेल्या बाबीचा आढावा दिला. त्यानंतर औरवाड (ता. शिरोळ) येथे दर्ग्याचा पायाभरणी शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, अबीद पटेल, असरफ पटेल उपस्थित होते.

बैठकीवेळी मदन कारंडे, जिल्हा युवाध्यक्ष रोहित पाटील, बी.जी.माने, रावसाहेब भिलवडे, राजगोंडा पाटील, चंद्रशेखर मगदूम, किरण कोळी, पृथ्वीराज देसाई आदी उपस्थित होते.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *