मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
बीडच्या सभेत मंत्री आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही जुन्या गोष्टींच्या संदर्भ देत शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला. त्यावर शरद पवारांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी भुजबळांवर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी भुजबळांना उत्तर दिलं. पवार म्हणाले, “तेव्हा जर राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते.
दरम्यान, सर्वच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मनात कुठलाही संभ्रम ठेवू नका, आता लढायला लागा, असा संदेशही यावेळी शरद पवार यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे, पण त्यांना समजवणार कोण? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
साहेब, मला एक कळलं नाही, तुम्ही 23 डिसेंबर 2003 ला माझा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. मी गृहमंत्री होतो. प्रफुल्ल पटेल तिथे होते. त्यांना बोलावण्यात आलं. तेलगी प्रकरण होतं. त्याला मी अटक केल. त्याच्यावर मोक्का लावायला लावला. कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. साहेब, तुम्ही मला बोलावल आणि सांगितलं की, भुजबळ तुम्ही राजीनामा द्या, असं छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले होते.