औरंगाबाद4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लाखोंचे मोर्चे ज्या मराठा समाजाने काढल्यानंतर कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र जालना जिल्ह्यातील एका गावामध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चावर पोलिसाकडून लाठीचार्ज का केला गेला. तसेच आता जे मोठे नेते भेटीसाठी येत आहेत त्यांची भेट म्हणजे केवळ नाटक असून ते मराठा समाजाला ‘उल्लू’ बनवत असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. जलील शनिवारी रात्री संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे देखील मुंबईवरून विमानतळावर दाखल झाले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना जलील म्हणाले की मी आमदार असताना सत्तेत असलेले हेच लोक मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत होते. मात्र आता सत्तेत असतांना त्याची भाषा बदलली आहे. सत्ताधारी लोक आरक्षण न देता मराठा समाजावर लाठीचार्ज केला जातो. लाखोच्या संख्येने मराठा समाजाने आंदोलन केले गेले असताना कुठलीही घटना घडली नाही. मात्र जालना जिल्ह्यातील छोट्या गावात हल्ला कसा झाला असा सवाल त्यांनी केला आहे.
नेत्यांच्या भेटीवर काय म्हणाले- खा. जलील, पाहा, व्हिडिओ
पाहणी दौरे केवळ एक ड्रामा
जलील म्हणाले की मोदी साहेबाच्या देशात हुकुमशाही सुरु आहे.आम्ही जे करणार ते बरोबर तुम्ही आमच्या विरोधात गेल्यास अशी कारवाई केली जाईल असा इशाराच या घटनेतून दिला गेला आहे. आता जे नेते येत आहेत ते केवळ ड्रामा करण्यासाठी येत असून मराठा समाजाला आपण उल्लु कसे बनवता येईल अशी टिका त्यांनी यावेळी केली. हेच लोक सत्तेत बसले होते आणि आता हेच लोक येवून कशाला नाटक करत आहेत की आमची सहानुभुती त्यांच्या पाठीशी आहे. कोणालाही मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही अशी टिका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे लोकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.