Shikhar Dhawan : सर्वांसमोर शिखरची कॉलर पकडली आणि…; धवनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

Shikhar Dhawan Video : टीम इंडिया सध्या एशिया कपच्या तयारीमध्ये आहे. येत्या 30 तारखेपासून आशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. नुकतंच एशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून यामध्ये भारताचा गब्बर म्हणजेच शिखर धवनला टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. अशातच आता शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल झाला असून यामध्ये एका व्यक्तीने शिखरची ( Shikhar Dhawan ) कॉलर पकडून त्याला धमकी देत असल्याचं दिसून येतंय. 

शिखर धवनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

एशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करताना सिलेक्टर्सने शिखर ( Shikhar Dhawan ) च्या नावाचा विचार केला नाही. तर दुसरीकडे एशियन्स गेममध्ये शिखरला टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होत होती. मात्र त्यामध्ये धवनचा पत्ता कट करण्यात आला. 

क्रिकेटच्या मैदानापासून दूर असल्यावर सध्या सोशल मीडियावर ( Social Media ) मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह दिसून येतोय. यावेळी धवनने ( Shikhar Dhawan ) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यामध्ये धवनला धमकी मिळत असल्याचं पहायला मिळतंय. 

Related News

सर्वांसमोर पकडली शिखरची कॉलर आणि…

मुख्य म्हणजे हा व्हिडीओ धवन ( Shikhar Dhawan ) ने मस्तीच्या मूडमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ शिखर ( Shikhar Dhawan ) ने त्याच्या वडिलांसोबत शूट केलाय. यावेळी शिखर धवनच्या वडिलांनी शिखरची कॉलर पकडलीये आणि ते त्याच्यावर ओरडताना दिसतायत. 

शिखरची कॉलर पकडून ते शिखरला म्हणतायत की, जास्त जोरात बोलू नकोस, मोठा आवाज आवडत नाही मला…( ऊंची आवाज में बात मत किया करो, शोर हमें पसंद नहीं.  ) असं म्हणून वडील शिखरची कॉलर झटकून देतात. यासोबतच धवनने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, वडिलांशी मोठ्या आवाजात बोलू नका, ही गोष्ट तुम्हाला महागात पडू शकते. 

कसं आहे शिखर धवनचं करियर

एशिया कपसाठी धवनच्या नावाचा विचार न झाल्याने त्याची टीम इंडियामध्ये कधी एन्ट्री होणार हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. शिखरने आतापर्यंत 34 टेस्ट सामने, 167 वनडे सामने आणि एकूण 68 टी-20 सामने खेळले आहेत. यावेळी वनडेमध्ये त्याने 39 अर्धशतकं आणि 17 शकतं ठोकली आहेत. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *