Shiv Sena MLA Disqualification Case | १६ आमदार अपात्रता प्रकरण : विधानसभा अध्यक्षांकडून एका आठवड्यात कार्यवाही अपेक्षित : सुप्रीम कोर्ट | महातंत्र








नवी दिल्ली, महातंत्र ऑनलाईन : १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात कार्यवाही करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्षांनी वाजवी कालावधीत कार्यवाही ठरवावी. आम्ही आता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट वेळ मर्याद निश्चित करून एका आठवड्यात अध्यक्षांद्वारे प्रक्रियात्मक निर्देश जारी केले जातील. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे न्यायालयाला कळवतील की कार्यवाही निकाली काढण्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित केली जात आहे, असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २ आठवड्यांनी होणार आहे. आम्ही दोन आठवड्यांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ. यासाठी किती वेळ लागेल याबद्दल सांगा. याबाबत कार्यवाही अनिश्चित काळासाठी चालू ठेवू शकत नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी, मागच्या सुनावणीच्यावेळी विलंब का झाला ते त्यांनी अध्यक्षांसमोर मांडावे. कुणी वेळ मागितला हे कृपया तपासा असा युक्तिवाद केला. या प्रकरणी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *