अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सुनील पाटील डिके यांच्या नेतृत्वात आज, गुरुवारी एसडीओ कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आली. सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षातील पिक विमा मिळावा, वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शेतकऱ्यांना दिवसा किमान १२ तास कृषी पंपाला वीज द्या, २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीचे अनुदान कोणतीही अट न लावता द्या, शेतीसाठी पांदण रस्ते उपलब्ध करुन द्या, दर्यापूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती मशागतीची कामे करा, शेतकरी-शेतमजूर-बेघरांना घरकुल योजनेचा लाभ द्या आदी मुद्दे यावेळी रेटण्यात आले.
मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मनोज लोणारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील पाटील डीके यांच्यासह सहकार सेना तालुका प्रमुख गणेशराव लाजूरकर, इतर पदाधिकारी मोहन बायस्कार, शरद वानखडे, सतीश साखरे, बबनराव विल्हेकर, बाळासाहेब बगाळे, गजानन शिंगणे, सुनील जुनघरे, सुखदेव मानकर, बाळासाहेब शेळके, जगदीश मोरे, विजय ठाकरे, संतोष हागे, मंगेश भांडे, दिलीप रहाटे, योगेश मोपारी, वैकुंठ सांगोले, अंकुश कावडकर, प्रदीप घाटे, किशोर बिजवाडे, पप्पू गावंडे, मोहन सांगोले, प्रमोद टेवरे, विनोद वडतकर, अभिजित टाले, निलेश जुनघरे, राहुल सांगोले, भीमराव लाजूरकर, प्रकाश राऊत, सेवकराम लाजूरकर, पंकज रेखे, राजिक शाह, रहेमान शाह, आसिफ शाह, इब्राहिम शाह, मनोज लोखंडे, प्रतीक राऊत, सुनील भारसाकळे, गजानन सगणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.