धक्कादायक: विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला; शिक्षकाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल, चिठ्ठीत लिहिला घटनाक्रम

पुणे12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोणत्याही व्यक्तीला घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाबद्दल नकोश्या बातम्या समोर येत असतानाच काही घटना खरोखरच आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करत असतात. आपले सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक तसे दुर्मिळच. पण असाच काहीसा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यामध्ये घडला आहे. सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने एका शिक्षकाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मयत शिक्षक अरविंद देवकर हे दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकतीच दोन महिन्यांपूर्वी बदलून आले होते. त्यांच्या वस्तीवरील शाळेत अवघे दहा विद्यार्थी होते. दरम्यान नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही कारणामुळे मुलांचा दाखला दुसऱ्या शाळेत घातला. यामुळे अरविंद खचले होते, अशी माहिती मिळते आहे. याच तणावात येऊन त्यांनी शाळेतच तणनाशक हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा 3 ऑगस्ट रोजी प्रयत्न केला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?

गावातील छोट्याश्या शाळेची दुरावस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचेही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अऱविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना आवडला नाही. यानंतर पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवले. शाळेतील सर्व 10 विद्यार्था शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झाले. आणि त्यांनी याच तणावातून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

अरविंद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठीदेखील लिहिली आहे. पूर्वीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला चांगले सहकारी लाभले होते असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. आत्महत्येपूर्वी अरविंद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला आहे. आपली नियुक्ती मे महिन्यामध्ये झाली होती. त्यानंतर नेमके काय काय घडले आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपण काम करुन घेतल्याने पालक नाराज झाले यासंदर्भातील तपशीलही अरविंद यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. अरविंद यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *