सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात अघोरी उपचार, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार

Aghori Treatment: देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळतोय. जगाने विज्ञानाची कास धरली असताना दुसरीकडे पालघरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क अघोरी उपचार करण्यात आले. हे उपचार कोणत्या बाबा-बुवाच्या आश्रमात नव्हे तर रुग्णालयात करण्यात आले, हे खूपच भयावह होते.

पालघर रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर समोर आला आहे. 

Related News

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी

तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोन्या लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. येथे त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. पण काही वेळाने येथे एक मांत्रिक आला. आणि त्याने रुग्णावर त्याच्या पद्धतीने उपचार करण्यास सुरुवात केली. ही घटना पाहुन रुग्णालयातील डॉक्टरदेखील चक्रावून गेले. रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. 

यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखीन बिघडली असून त्यांना सध्या या रुग्णाला दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. 

आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे ‘असे’ झाले सेक्स्टॉर्शन

दरम्यान रुग्णालय प्रशासनाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनीच मांत्रिकाला येथे आणले. आम्ही याला विरोध केला पण नातेवाईकांनी ऐकले नाही. ते आम्हाला विरोध करु लागले. यानंतर त्यांच्याच नातेवाईकांनी व्हिडीओ तयार केल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून वारंवार अघोरी विद्या, तांत्रिक, मांत्रिकांचा पर्दापाश केला जातो.त्यांना आव्हान दिले जाते आणि जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाते. तरीही महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून असे प्रकार वारंवार समोर येत असतात.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *