Shreyas Iyer : खांद्याची दुखापत अन् परिस्थितीशी झगडला, श्रेयस अय्यरचं वादळी शतक; पाहा Video

Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही. त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल की नाही? असा सवाल विचारला जात होता. मात्र, श्रेयसला संधी मिळाली खरी पण आता मैदानात उतरणार की बाकावर बसणार? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिसऱ्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरने खणखणीत शतक ठोकलं आहे.

श्रेयस अय्यरने फक्त 86 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने यावेळी 10 फोर अन् 3 गगनचुंबी सिक्स देखील खेचले. सुरूवातीपासून श्रेयस अय्यरचा माईंडसेट पूर्ण क्लियर वाटत होता. त्याच्या फलंदाजीत एक लय दिसत होती. बाकी काहीही होऊ दे मला मैदानात थांबायचंय अन् खेळायचंय, असं स्पष्टपणे अय्यरला दिसत होतं. सुरूवातीपासून अय्यरने धावगती वाढवली. अर्धशतक पूर्ण केलं अन् मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्यानंतर एक खराब बॉलवर अय्यर बाद झाला.

पाहा Video

आणखी वाचा – IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (C), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (C), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *