वॉशिंग्टन16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाचे एक हिडन टॅलेंट जगासमोर आले आहे. अमेरिकेच्या रस्त्यावर नुकताच तो थिरकताना दिसला. 34 वर्षीय जडेजा सध्या कुटुंबासोबत अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करत आहे.
सोमवारी, जडेजाची पत्नी रिवाबाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर जड्डूच्या डान्स मूव्हजचा एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला, त्यामध्ये जडेजा मुकाबला… मुकाबला सारख्या बॉलीवूड नंबरवर डान्स करताना दिसत आहे. रिवाबाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले- ‘जेव्हा तुम्हाला मिस्टर आरजेच्या हिडन टॅलेंटबद्दल माहिती मिळते.’
या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच्या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत.
टी-२० मालिकेतून विश्रांती
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत जडेजाला टीम इंडियाकडून विश्रांती देण्यात आली आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग होता. भारताने कसोटी मालिका 1-0 आणि एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
टीम इंडिया टी-20 मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे
जडेजा, रोहित आणि कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय टी-20 मालिका खेळणारी टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. कालच विंडीजने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 2 गडी राखून पराभव केला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारतावर 2 गडी राखून मात केली.
जड्डू ने केले ‘प्रयोग’करण्याचे समर्थन
कसोटी मालिका जिंकल्यानंतर जडेजाने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने केलेल्या प्रयोगांचा बचाव केला. तो म्हणाला- ‘विश्वचषक आणि आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार ठरलेले आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. विश्वचषकात कोणाला संधी द्यायची हे कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला माहीत आहे. बदलाबाबत कोणताही संभ्रम नाही.