सिराजचे एकाच षटकात 4 बळी!: अवघ्या 2 तासांत खेळ संपला; पण तरीही सिराजला स्टुअर्ड बिनीचा ‘तो’ रेकॉर्ड नाही मोडता आला

  • Marathi News
  • Sports
  • Asia Cup 2023 Final Ind Vs Sl Mohammed Siraj Take 6 Wikets But Missed To Break Stuart Binny Record 

नवी दिल्ली6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

टीम इंडियाने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या उरलेल्या चेंडूंच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. संघाने 263 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. यापूर्वी टीम इंडियाने 2001 मध्ये केनियाचा 231 चेंडू राखून पराभव केला होता.

भारतीय गोलंदाज ठरले हिरो
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु, त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात सलामीवीर कुसल परेरा याला पव्हेलियनचा रस्ता दाखवत दंड थोपटले. तर पुढच्याच काही षटकांमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला.

मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांनी अवघ्या 15.2 षटकांत श्रीलंकेचे सर्व फलंदाज बाद केले. श्रीलंकेला केवळ 50 धावा जमवता आल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात 7 षटकांत 21 धावा देत 6 बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने 2.2 षटकांत 3 धावा देत 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला. 15.2 षटकांत श्रीलंकेला सर्व गड्यांच्या बदल्यात केवळ 50 धावांपर्यंत मजल मारता आली.

सिराजने विक्रम केला पण…
49 वर्षांच्या भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय गोलंदाजाने एका षटकात चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली, 6 बळी घेतले, परंतु, त्याला एक विक्रम मोडता आला नाही.

आधी कुंबळेंचा विक्रम नंतर स्टुअर्टच्या नावावर
एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा, सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिनीच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात 6 षटकांत 4 धावा देत 6 बळी घेण्याचा पराक्रम केला होता.

हा विक्रम आधी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. यात अनिल कुंबळेने 1993 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात 6 षटकांत 12 धावा देत 6 बळी घेतले होते. या यादीत सिराजने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने आजच्या सामन्यात 6 षटकांत 21 धावा देत 6 बळी घेतले आहेत.

2000मध्ये भारताचा झाला होता लाजीरवाना पराभव
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला 22 षटकांत 73 धावांत गुंडाळलं होतं. इतकंच नव्हे तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने 2024 मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध 58 धावा केल्या होत्या. 50 धावा ही कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघ 2000 साली शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध 54 धावांत ऑल-आऊट झाला होता. भारताचा हा लाजिरवाना विक्रम आज श्रीलंकेने मोडला आहे.

मोहम्मदने या सामन्यात गोलंदाजीचे दर्शन घडवले
मोहम्मद सिराजने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने तब्बल 6 बळी घेतले. यापैकी 4 बळी त्याने एकाच षटकात घेतले. सिराजने सामन्यातील चौथ्या आणि वैयक्तिक दुसऱ्याच षटकात ही कामगिरी केली. एकाच षटकात चार बळी घेण्याचा विक्रम सिराजने नोंदवला.

हे ही वाचा सविस्तर

भारताने 8 वा आशिया कप जिंकला:श्रीलंकेवर 10 गड्यांनी मात, सर्वात वेगवान वनडे विजय मिळवला, सिराज ठरला विजयाचा शिल्पकार

टीम इंडियाने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. – येथे वाचा संपूर्ण बातमी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *