Solapur:वडिलांचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्यालाच केली बेदम मारहाण

Solapur News Today: प्रेमविवाहाला (Love Marriage) विरोध केला म्हणून पोटच्या मुलीनेच बापाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. सोलापूरातील (Solapur) माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Daughter beat Her Father)

प्रियकराच्या मदतीने मारहाण

प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीनेच मित्रांच्या साथीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. प्रियकराच्या मदतीने साक्षी शहा हिने वडील महेंद्र शाह यांना बेदम मारहाण केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक कारण उघड

साक्षीहिचे एका तरुणावर प्रेम होते तिने त्याच्यासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, तिच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता. याचा राग तिच्या मनात होता. साक्षी कामानिमित्त पुण्याला गेली होती. पुण्यावरून परत येताना वडील तीला शेटफळजवळ घ्यायला गेले होते. 

Related News

पोलिसात दाखल केली तक्रार

शेटफळवरून घरी जात असताना. साक्षीने लघुशंका करण्यासाठी वडाचीवाडी येथे गाडी थांबवली. त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने महेंद्र शहा यांना मारहाण केली. यानंतर साक्षीने पोलीस ठाण्यास फिर्याद दिली आणि वडिलांना रुग्णालयात दाखल केले.

साक्षीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांचा आणि तिचा जबाब घेतला. मात्र पोलिसांना साक्षीच्या जबाबातील विसंगती पाहून संशय आला. त्यानंतर  पोलिसांनी तपासाची दिशा फिरवत सखोल तपास केला. तेव्हा साक्षी आणि तिच्या प्रियकरांनीच हा कट रचला असल्याचे उघड झाले.

24 तासांच्या आत केली अटक

पोलिसांनी 24 तासांच्या आत साक्षीसह पाच जणांना अटक केली आहे साक्षी शहा,चैतन्य कांबळे, आतिश लंकेश्वर, रामा पवार, बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *