प्रकाश सोळंकेच्या घरावर दगडफेक, सुभाष देशमुखांना घेराव; आतापर्यंत कुठे कुठे काय काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक होतांना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. तर आता थेट नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलक धडकत असून, जाब विचारत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे, तर, माजी मंत्री सुभाष देशमुखांच्या (Subhash Deshmukh) घरावर धडक देत त्यांना घेराव घालण्यात आला आहे. सोबतच बदामराव पंडितांची (Badamrao Pandit) गाडी फोडण्यात आली आहे. यासह अनेक नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. 

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक केली आहे. जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी एका फोनवरून केलेलं संभाषण सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी सोळंकेंच्या घरावर धडक देऊन तुफान दगडफेक केली आहे. सोबतच त्यांच्या घराखाली पर्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांना पेटवून दिले आहे. तब्बल एक तास ही दगडफेक सुरु होती. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

Related News

सुभाष देशमुखांना घेराव

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका भाजप आमदार सुभाष देशमुख यांना देखील बसला आहे. देशमुख यांच्या सोलापुरातील घरावर सकल मराठा समाजाचे 150  पेक्षा अधिक कार्यकर्ते धडकले होते. देशमुख यांच्या घराबाहेर मराठा समाजाचे कार्यकर्ते एकवटले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यावेळी सुभाष देशमुख यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घालत जाब विचारला. तसेच, आमदार सुभाष देशमुख यांनी तात्काळ मुंबईला जाऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

बदामराव पंडितांची गाडी फोडली…

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. गावागावात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर, याचाच फटका माजी आमदार बदामराव पंडित यांना बसला आहे. मोही माता यात्रेसाठी गेलेल्या बदामराव पंडित यांना मराठा समजाच्या तरुणांनी विरोध केला. तसेच, त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी देखील फोडली आहे. यावेळी बदामराव पंडित यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मनोज जरांगेंबाबतचं ‘हेच’ वक्तव्य आमदार प्रकाश सोळंकेंना भोवलं; मराठा आंदोलकांची घरावर दगडफेक, गाड्याही जाळल्या

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *