इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीची जोरदार तयारी

INDIA vs Mahayuti : विरोधकांच्या इंडिया आघाडीची (INDIA) आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तर या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही (Mahayuti) मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील ‘ग्रॅण्ड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे.

देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. पार्लेश्वर ढोल पथक मुलींची लेझीम पथक ग्रॅण्ड हयात इथे सर्व नेत्यांचे स्वागत करतील. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर आठ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलां आहे. डिनरमध्ये खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे.

‘इंडिया’ची ताकद वाढली

या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी(PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Related News

‘या’ मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.” दरम्यान इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *