‘ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा’ स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगलाने (Minor Couple) सोशल मीडियावर स्टेटस (Social Media Status) ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण त्यांच्या प्रमेला दोघांच्या घरातून विरोध होता. त्यामुळे या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रेमी युगुरलाने नायलॉन दोरीने गळफास (Suicide) घेत जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवलं होतं. ‘ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका’ अशा प्रकारचा स्टेटस ठेवत दोघांनीही जीवन संपवलं आहे. 

आत्महत्या केलेला तरुण हा मुस्लिम तर युवती ही हिंदू समाजातील आहे. आत्महत्या केलेला तरुण 18 वर्षाचा तर युवतीचं वय 16 वर्षात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एक खळबळ उडाली आहे. हे दोघेही अल्पवयीन एकाच परिसरात राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते, पण दोघेही वेगळे धर्माचे असल्याने या प्रेम संबंधात घरच्यांकडून तीव्र विरोध होता. अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समज ही दिली होती. 

मात्र आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही. या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोंखडी पाईपला नायलॉनच्या दोरीने जीवन संपवले. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर इथं पाठवून दिले आहे. दोन्ही कुटूंबातील नातेवाईकानी कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Related News

ठाण्यात तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
नवरा आणि त्याच्या नातेवाईकांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील एका तरुणीने आपल्या लहान मुलीसह जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना ठाण्यासारख्या सुशिक्षितांच्या शहरात घडल्याने एकच हळहळ व्यक्त होतेय. प्रियांका मोहिते असं या विवाहित तरुणीच नाव असून ती नवऱ्यासोबत घोडबंदर रोड कासारवडावली इथल्या जॉय स्केअर सोसायटीत रहात होती..काल पती सोबत आणि सासरच्या व्यक्तींसोबत तिचा वाद झाल्यानंतर तिने व्हाट्सप वर स्टेटस ठेऊन आपण होणाऱ्या छळाला आता कंटाळलो असून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं.

यासाठी आपला पती,सासू आणि नणंद यांना जबाबदार धरून त्यांना शिक्षा व्हावी असेही तिने स्टेटस मध्ये लिहिले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास 6व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून आपल्या अवघ्या एक वर्षे वयाच्या लेकिसह उडी मारून आपलं जीवन संपवलं..या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.दरम्यान या प्रकरणी कासारवडावली पोलिसानी तिचा पती महेश मोहिते याला अटक केली असून त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी केलीय.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *